पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजास ओ.बी.सी. प्रवर्गातून ५० टक्केच्या आतमधील आरक्षणाच्या मागणीची माहिती देणे तसेच समाजबांधवांच्या गाठीभेटीच्या दौऱ्यानिमित जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बाळासाहेब पठारे, सचिन सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही सभा महालक्ष्मी लॉन्स, खराडी, येथे सोमवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. होणार असून सभेसाठी मराठा संघर्ष यौद्धा मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहून समाजबांधवांना संबोधित करणार आहेत. पुणे जिल्हयातील खेड राजगुरूनगर, बारामती, इंदापूर येथे राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याच्या समेनंतर जरांगे पाटील हे खराडी येथे येऊन प्रामुख्याने पुणे, पिंपरी चिंचवड, शहरी तसेच नजिकच्या ग्रामीण भागातील समाज बांधवांचे मागणीनुसार खराडी येथे सभा घेणार आहेत.
या सभेचे नियोजन खराडी, वाघोली, चंदननगर, लोणीकंद, हडपसर, पुणे, पिंपरी चिंचवड येथील सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, विविध मराठा संघटना यांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ मंडळे यांचेकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा