सांगली : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई

सांगली : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई

जत; पुढारी वृत्तसेवा : कमी दरात सोने देतो, असे सांगून आंध्रप्रदेशातील एका सुवर्णकाराची साडेसव्वीस लाखाची पाच जणांनी फसवणूक केली होती. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. ही घटना गुरुवारी (दि. २) नोव्हेंबर रोजी घडली होती. याच प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आज (दि.९) ३ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी केली आहे. यामुळे या प्रकरणातील गुंता आणखीच वाढत चालला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

जत पोलीस ठाण्याकडील समीर जबरदस्त मुल्ला (पोलीस शिपाई), विजय मच्छिंद्र नरळे (पोलीस शिपाई), महादेव तुळशीराम धुमाळ (पोलीस हवालदार) या तिघांचे तडकाफडकी सेवेतून निलंबन करण्यात आले आहे. आणखी या प्रकरणात तळाशी गेल्यास प्रकरणाचे मुख्य मोहरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आंध्र प्रदेशातील एका सुवर्णकारास जत तालुक्यातील पाच जणांनी स्वस्तात सोने देतो, म्हणून बोलवून घेतले होते. यावेळी संबंधित व्यक्तीस सोने न देता त्याच्याकडील साडेसव्वीस लाखाची पैशाची बॅग पळवून नेली होती. या घटनेदरम्यान जत पोलीस कॉन्स्टेबल समीर मुल्ला व अन्य एकजण पोलीस घटनास्थळी असल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. याच वेळेला माजी आमदार विलासराव जगताप यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दरोडासारखा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. या प्रकरणातील दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केल्या असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

फरारी आरोपीना अटक; पाच दिवसाची पोलीस कोठडी

या प्रकरणातील रमेश कोळी व अमोल कुलकर्णी यांना रविवारी (दि.५) अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. तर अनिल सुतार यास वैद्यकीय कारणास्तव नोटीस देऊन कार्यवाही करण्यात आली होती. परंतु या प्रकरणातील मेहबूब जातगार, दर्याप्पा हवीनाळ मिस्त्री हे दोघे आरोपी फरारी होते. अखेर या दोघांना आज (दि.११) अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले. याप्रकरणी चौघांनाही पाच दिवसाची सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news