राशिवडे, प्रवीण ढोणे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे गटाने सताधारी आमदार पी.एन.पाटील यांच्या आघाडीला पाठींबा दिला. तर माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर गटाने तिसऱ्या पॅनेलची घोषणा केली. त्यामुळे सताधारी पॅनेलसह भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, चरापले गट आघाडी या तीन आघाडीमध्ये लढत होणार आहे.
सताधारी आमदार पी.एन.पाटील गटाने राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील, शेकापचे क्रांतीसिह पवार-पाटील यांचेशी आघाडी करुन पँनेलची घोषणा केली. तर विरोधी भाजपचे हंबीरराव पाटील, शिवसेनेचे चंद्रदीप नरके गट, सदाशिव चरापले, स्वाभिमानी संघटना आघाडी तर माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर गटानेही नाट्यमयरित्या तिसरे पँनेल जाहीर केले. सताधारी गटाने माघारीच्या आदल्या दिवशीच पॅनेलची घोषणा केली. गेले दोन दिवस नाट्यमय राजकीय घडामोडी सुरु होत्या. धैर्यशील पाटील गट, चरापले गट, भाजप, नरके गट आणि स्वाभिमानी संघटना अशी आघाडी होईल, असे वाटत होते. मात्र, राष्ट्रवादीचे धैर्यशील पाटील यांनी तिसऱ्या पॅनेलची घोषणा करत धक्का दिला.
भोगावतीची निवडणुक पक्षीय स्तरावर न होता नव्या आघाडींची रचला झाली. यामध्ये सताधारी काँग्रेसचे आमदार पी.एन.गटासोबत राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील,शेकापचे क्रांतीसिंह पवार-पाटील यांनी युती केली.तर विरोधी भाजप,शिवसेना नरकेगट,काँग्रेसचे सदाशिव चरापले गट,स्वाभिमानीची युती झाली. तर राष्ट्रवादीचे धैर्यशील पाटील गटाने स्वतंत्र पँनेलची घोषणा केली.
सताधारी गटाच्या राजकीय हालचाली बोद्रेदादा बँक ,भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, चरापले आघाडीच्या राजकीय हालचाली माजी आमदार नरके यांच्या कळंबा येथील कार्यालयातून झाल्या. तर कौलवकर पॅनेलच्या राजकीय हालचालीची सूत्रे शाहुपुरीतील चौगले पतसंस्थेतून झाल्या.
कारखान्याच्या २५ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. कौलव गटातून १३ , राशिवडे गटातून १२, कसबा तारळे गटातून ९, कुरुकली गटातून १३, सडोली खा गटातून १२, हसुर दुमाला गटातुन ६,महिला गट ६,अनुसूचित गट ४,मागासगट ३,भटक्या जाती गट ३ असे ८१उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सहा अपक्षांचा समावेश आहे.