कोकरूड- नेर्लेजवळ खासगी बस ४० फूट खोल वारणा नदीत पडली; प्रवासी सुखरूप | पुढारी

कोकरूड- नेर्लेजवळ खासगी बस ४० फूट खोल वारणा नदीत पडली; प्रवासी सुखरूप

कोकरूड: पुढारी वृत्तसेवा : कराड-रत्नागिरी मार्गावरील कोकरूड- नेर्ले (वारणा) पुलाजवळच्या एका वळणावर खासगी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस नदी पात्रात पडली. या अपघातात बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. ९ ) रोजी सकाळी घडला.

संबंधित बातम्या 

मिळालेली माहिती अशी की, खासगी प्रवासी बस ( क्रमांक एआर-११ ए ७५६७) ही गोव्याहून रात्री १ वाजता मुंबईला निघाली होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोकरूड येथील वारण नदीवरील कोकरूड -नेर्ले पुलावरील धोकादायक वळणावर बस आली. त्यावेळी बस चालकाचा ताबा सुटला आणि बस ४० फूट खोल वारणा नदी पात्रात पडली.

दरम्यान, बस संरक्षण लोखंडी कठड्यावर धडकल्याने मोठा आवाज झाला. यामुळे बसमधील प्रवासांनी भयभीत होवून आरडाओरडा केला. बस नदीपात्रात पडल्याने तिचे पुढील दोन्ही चाके मातीत रुतून बसली. यामुळे प्रवासी सुखरूप बचावले आहेत. या अपगातात सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही. परंतु, बसचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शाहुवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी येवून घटनास्थळाची पाहणी केली.

Back to top button