सांगली : पुढारी वृत्तसेवा सांगली जिल्ह्यात आज (बुधवार) पहाटे पासून अवकाळी पावसाने सुरुवात झाली. कालपासूनच सांगली शहरात आणि जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज (बुधवार) पहाटेपासून जिल्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर सकाळ पासून सांगली, मिरज शहरात मुसळधार पाऊस पडत आहे.
तसेच इस्लामपूर, पलूस, तासगाव, आटपाडी या ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस पडत आहे. काढणीला आलेल्या भात पिकाचे आणि फुले येत असलेल्या तसेच कोवळे मणी तयार होण्याच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष पिकाचे या अवकाळी पावसामुळे नुकसान होणार आहे. अचानक पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. तसेच दिवाळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.
हेही वाचा :