Diwali Easy Mehndi Designs :लगबगीतदेखील अशी काढा ‘मेंहदी डिझाईन्स’ | पुढारी

Diwali Easy Mehndi Designs :लगबगीतदेखील अशी काढा 'मेंहदी डिझाईन्स'

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाही दसरा संपल्यानंतर आतुरता आहे ती दिवाळी सणाची. नुकतेच आपल्या सर्वांचा लाडका सण म्हणजे, दिवाळीच्या धामधूमीला सुरूवात झाली. दिवाळी म्हटलं की, प्रथम सुचते ते खरेदी. मग ती कपड्यासाठी असो वा दिवाळीच्या फराळासाठी. दिवाळीत जणू फराळासोबत पै- पाहुण्यांची रेलचल असते. या काळात शाळांना सुट्टी असल्याने तर बच्चे कंपनीची औरच मज्जा असते. दरम्यान एकिकडे महिला वर्ग देवीची पुजा, रांगोळी, वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवण्यात गुंग असतात. तर दुसरीकडे सणासुदीचे दिवस म्हटलं की, महिला वर्गाची नटणं- सजणं- मुरडणं जणू पर्वणीच असते. महिलांचे मेंहदी आणि रांगोळी काढण्यासाठी कसब लागते. (Diwali Easy Mehndi Designs ) सणासुदीत महिलांना नटण्यासाठी वेळ कमी असतो. यासाठी अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने मेंहदी आणि रांगोळी कशी काढायची? हा प्रश्न उपस्थित होतो. यासठी आज आम्ही आपणास मेंहदी डिझाईनच्या काही सुंदर आणि सोपी पद्धत सांगणार आहोत. ( Diwali Easy Mehndi Designs )

संबंधित बातम्या 

मंडला आर्ट मेंहंदी डिझाईन

आजकाल तरुणींमध्ये मांडला आर्ट मेहंदी डिझाईनला खूपच पसंती आहे. या मेंहदी प्रकारात आपणास अनेक मेंहदीचे सोपे प्रकार पाहायला मिळतात. यामुळे यंदाच्या दिवाळीत हा प्रकार तुम्ही जरूर ट्राय करू शकता. टूथपिकच्या मदतीने आपण ही मेंहदी हातावर रेखाटू शकतो. तसेच गोल डिझाईन बनवण्यासाठी तुम्ही हातातील बांगडीचादेखील वापरू शकता.

मिनिमल मेहंदी डिझाईन

यंदाच्या दिवाळीत जर तुम्हाला सुंदर अशी पायावर मेंहदी डिझाईन काढायची झाल्यास मॉडर्न आणि मिनिमल मेहंदी डिझाईनचा वापर करावा. ही मेंहदी काढायला सोपी आणि कमी वेळेत आकर्षक दिसणारा हा प्रकारात मोडत आहे. झटपट मेंहदी काढण्यासाठी तुम्ही टूथपिक आणि इअर बड्सची मदत घेऊ शकता.

कट-आउट बेल मेहंदी डिझाईन

दिवाळीच्या काळात महिला आणि तरुणीची सुंदर दिसण्याची लगबग सुरू असते. या दरम्यान मेंहदी काढण्यासाठी कमी वेळेत आणि सोपा प्रकार म्हणेज, कट-आउट बेल मेहंदी डिझाईन ट्राय करा. मेंहदीचा हा प्रकार सोपा असून हातावर खुलून दिसतोय. या प्रकारात आधुनिक आणि पारंपरिक लूक उठावदार आणि मोहक दिसतो.

झूमर डिझाईन मेंहदी

दिवाळीत मेंहदी काढायण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे, झूमर डिझाईन मेंहदी होय. ही मेंहदी तुम्ही हलक्या हाताने पायांवर रेखाटू शकतो. या प्रकारात झुंबरसारखी रचना पाहायला मिळतेय. पायांच्या बॉर्डरसाठी रुंद पट्ट्याचे डिझाईन निवडू शकता. तर पायांच्या बोटांसाठी बारीक केलेल्या झुंबराची रचना किंवा वेल डिझाइन करू शकता. तुम्हच्या पायावर ही डिझाईन खुपच आकर्षक दिसेल यात शंका नाही.

पूर्ण हात भरून मेहंदी डिझाईन

सणासुदिच्या दिवसात खास करून महिलांच्यात पूर्ण हात भरून मेहंदी काढण्यास प्राधान्य दिलं जाते. संपूर्ण हात भरून मेंहदी काढली की, आकर्षक आणि तितकीच सुंदर दिसते. यामुळे ज्यादा तर या प्रकारातीलच मेंहदी हातावर काढलेली पाहायला मिळते. या प्रकारात तुम्ही फुलां- पानांचे डिझाईन, कोयली, वेगवेगळे गोलाकार जाळे अशा आकर्षक पद्धती बनवू शकता. यामुळे यंदाच्या दिवाळी पूर्ण हात भरून मेहंदी डिझाईन नक्की ट्राय करा. ही मेंहदी काढण्यासाठी तुम्ही हायलाईट किंवा गडद रंगाची कोणताही मेहंदी निवडू शकता.

याशिवाय ब्रॉड लीफ मेंहदी डिझाईन, फूलं- पानेची मेंहदी डिझाईन, डबल लेयर फ्लोरल मेंहदी डिझाईन, जाळीदार फूल मेंहदी डिझाईन, पांनाची जाळीदार वर्क मेंहदी डिझाईन, पानांचा वेल मेंहदी डिझाईन, फूलं- पानेची चेन डिझाईन, शैडो फ्लोरल मेंहदी डिझाईन, सिंपल फुले- पाने मेहंदी डिझाईन यासारख्या अनेक मेंहदी प्रकारदेखील वापर करू शकता. यंदाच्या दिवाळी खुलून दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या हात- पायांवर वरीलपैकी कोणतीही मेंहदी नककी ट्राय करून पाहा. ( Diwali Easy Mehndi Designs )

Back to top button