सांगली : खानापूर तालुक्यातील चार गावांत ८५.३०% मतदान | पुढारी

सांगली : खानापूर तालुक्यातील चार गावांत ८५.३०% मतदान

विटा, पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील चार गावांतील ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत ८५.३०% मतदान झाले. यावेळी एकूण ४ हजार ४८२ पैकी ३ हजार ८२३ मतदान झाले. यामध्ये १ हजार ८५९ महिला आणि १ हजार ९६४ पुरूष मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडल्याचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी सांगितले.

आज रविवारी खानापूर तालुक्यातील पहिल्या टप्प्यात झालेल्या चार ग्रामपंचायतीच्या पंच वार्षिक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये साळशिंगे देवनगर राजधानी भेंडवडे आणि भेंडवडे गाव ठाण या चार गावांचा समावेश होता.सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे मतदान झाले.

एकूण टक्केवारी पुढीलप्रमाणे –

साळशिंगे (सर्वसाधारण महिला)- ३ – १९२४-१६९१-८१४-८७७-८७.८९%

देवनगर- ३-५१८-४१४-२००-२१४-७९.९२%

भेंडवडे (गावठाण)- (सर्वसाधारण) -३-१७१२- १४११-६८१-७३०-८२.४२%

भेंडवडे (राजधानी)(सर्वसाधारण महिला)-
– ३- ३२८-३०७- १६४- १४३-९३.६०%

हेही वाचलंत का?

Back to top button