सांगली : वाळवा तालुक्यात ‘स्वाभिमानी’ च्या आंदोलनाचा भडका; कार्यकर्त्यांनी ट्रक्टर, बैलगाडींचे टायर फोडले | पुढारी

सांगली : वाळवा तालुक्यात 'स्वाभिमानी' च्या आंदोलनाचा भडका; कार्यकर्त्यांनी ट्रक्टर, बैलगाडींचे टायर फोडले

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : गत हंगामातील उसाला प्रतिटन ४०० रुपये द्यावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गुरूवारी वाळवा तालुक्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा, राजारामबापू, हुतात्मा कारखान्याकडे निघालेल्या बैलगाड्या, ट्रक्टर रोखून त्यांच्या टायरी फोडल्या. गेल्या दोन – तीन दिवसांपासून  ‘स्वाभिमानी’ चे  ऊस आंदोलन पेटले आहे. जोपर्यंत ऊसाला प्रतिटन ४०० रूपये दर देत नाही, तोपर्यंत उसाचे एक कांडेही कारखान्याला जावू देणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

गुरुवारी दुपारी नवेखेड, जुनेखेड पुणदी, नरसिंहपुर, बोरगाव, किल्ले मच्छिद्रगड, लवणमाची आदी परिसरात ३५ बैलगाड्यांचे व १५ ट्रॅक्टरचे टायर संघटनेच्या कार्यकत्यांनी फोडले. रेठरे हरणाक्ष गावातील उस तोडणी मशिन संतप्त कार्यकर्त्यांनी बंद केले. अनेक ठिकाणी कारखाना प्रशासन व स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते याच्यात बाचाबाची झाली.

यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव , जगन्नाथ भोसले, आप्पासाहेब पाटील, प्रकाश देसाई, धैर्यशील पाटील, प्रविण पाटील, प्रभाकर पाटील, तानाजी साठे, पंडित सपकाळ, अनिल करळे, विलास पाटील, शहाजी पाटील, प्रताप पाटील, प्रदीप पाटील, काशिनाथ निंबाळकर, शामराव जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button