

जत;पुढारी वृत्तसेवा : करजगी (ता. जत) येथील एका ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी छापा टाकत ७८ किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत ७ लाख ८० हजार इतकी असून ही कारवाई आज (दि.३१) दुपारी साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी संशयित आरोपी बिराप्पा जनाप्पा हजंगी (रा. बंजाळवस्ती, करजगी) यांच्यावर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब हाक्के यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी हजगी यास मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उमदी पोलिसांनी गेल्या महिन्याभरात अवैद्य व्यवसायाविरोधात मोहीम सुरू केली आहे. करजगीतील एका ऊसाच्या शेतात गांजा लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथक तयार करण्यात आले. त्यानंतर आज(दि.३१) दुपारी करजगी गावापासून काही अंतरावर असलेल्या हंजगी यांच्या शेतात छापा टाकून उसातील गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची ७८ किलो इतके वजन झाले असून या गांजाची बाजार भावाप्रमाणे ७ लाख ८० हजार इतकी आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, आप्पासाहेब हाके, नामदेव काळेल, प्रशांत कोळी , मनीष कुंभरे, इंद्रजीत घोदे, महेश स्वामी यांनी केली.
हेही वाचा :