सातारा-कोल्हापूर, मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर सुरू होणार | पुढारी

सातारा-कोल्हापूर, मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर सुरू होणार

मिरज ; पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद झालेली सातारा-कोल्हापूर आणि मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर तब्बल अडीच वर्षानंतर सुरू होत आहे. मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर सोमवार (दि. 15) पासून तर सातारा-कोल्हापूर पॅसेंजर मंगळवार (दि. 16) पासून नियमीत वेळेत धावणार आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने सातारा-कोल्हापूर आणि मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा-कोल्हापूर पॅसेंजर ही सातारा येथून पहाटे 5.30 वाजता सुटेल. ती मिरजेत सकाळी 8.25 वाजता येईल.  कोल्हापूर येथे 9.55 वाजता पोहोचेल. कोल्हापूर-सातारा पॅसेंजर कोल्हापूर स्थानकातून दुपारी 4.55 वाजता सुटेल, मिरजेत सायंकाळी 5.45 वाजता येईल. सातारा येथे रात्री 10.50 वाजता पोहोचेल.

मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर मिरजेतून दररोज सकाळी 6.25 वाजता सुटेल. कुर्डुवाडी येथे सकाळी 10.15 वाजता पोहोचेल. कुर्डुवाडी येथून सकाळी 10.55 वाजता सुटेल. मिरजेत दुपारी 3.10 वाजता येईल. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

Back to top button