सांगली, सातारा जिल्ह्यातून तडीपार केलेला गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

सांगली, सातारा जिल्ह्यातून तडीपार केलेला गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

विटा; पुढारी वृत्तसेवा : महिनाभरापूर्वी दोन वर्षांसाठी सांगली आणि सातारा जिल्ह्यातून तडीपार केलेल्या टोळी प्रमुखास आज विटा पोलिसांनी पकडून कुरूंद वाड (जि.कोल्हापूर) पोलिसांच्या ताब्यात दिले. सागर अरविंद पवार (वय २६,रा.आयटीआय कॉलेज जवळ, विटा) असे त्याचे नाव आहे.

आगामी गणेशोत्सव तसेच इतर सण व उत्सव शांततेत पार पडावेत, कोणताही अनुचित प्रकार घडु नये, गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे या हेतूने विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सागर पवार टोळीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगली आणि सातारा जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई गेल्या महिन्या त ८ सप्टेंबर रोजी केली होती. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार ही कारवाई केली होती. मात्र हा सागर पवार आज सोमवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास येथील मायणी रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलसमोरील खुल्या मैदानात फिरत असल्याचे दिसून आले. यावरून त्यास विटा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने जिल्हाधिका-यांनी लागू केलेल्या तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्या तील एका खून प्रकरणात सागर पवार हा संशयित असल्याने कुरूंदवाड ( जि. कोल्हापूर) पोलिसांना पाहिजे होता. हे लक्षात घेऊन विटा चे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी पुढील तपास कामी त्यास कुरुंदवाड पोलिसां च्या दिले आहे.

Back to top button