सांगली : मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदी मौन का? कॉम्रेड अंजान यांचा सवाल | पुढारी

सांगली : मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदी मौन का? कॉम्रेड अंजान यांचा सवाल

विटा, पुढारी वृत्तसेवा : मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माैन का बाळगले आहे?, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉम्रेड अतुलकुमार अंजान यांनी केला. क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार अतुलकुमार अंजान यांना कॉम्रेड भालचंद्र काँगो यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी क्रांतीसिंह लोक विद्यापीठाचे समन्वयक कॉम्रेड सुभाष पाटील, सुभाष पवार, नानासाहेब पाटील, सयाजीराव पाटील, मेजर पांडुरंग शितोळे आदी उपस्थित होते.

यावेळी अतुलकुमार अंजान म्हणाले, २०२४ पर्यंत आपण शहाणे झालो नाहीत, तर येणारी लोकसभेची निवडणूक ही या देशातली शेवटची निवडणूक असणार आहे. सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनीच नव्हे तर या देशातील साहित्यिक,पत्रकार, कवी, उद्योजक,सिनेमा, नाट्य कलावंत आणि प्रत्येक सर्जनशील लोकांनी एकत्र येऊन या विरोधात लढले पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी या वेळी केले.

हेही वाचा :

Back to top button