“अजित दादा बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात” : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा | पुढारी

"अजित दादा बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात" : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पुढारी ऑनलाइन : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालयाचे डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केले. त्यानंतर  कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांना आश्चर्यचकित केलं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच शहा यांनी अजितदादांचं नाव घेतलं. ते म्हणतात, ” मी अजितदादांसोबत पहिल्यांदाच अशा पध्दतीने स्टेज शेअर करतो आहे. मी त्यांना सांगू इच्छितो कि, “दादा तुम्ही बऱ्याच काळाने योग्य जागी बसला आहात. पण या जागेपर्यंत येण्यासाठी तुम्ही बराच उशीर केला.” यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस उपस्थित होते.

“कधी माझ्या ऑफिसमध्ये चहासाठी आलात तर..” 

सहकार चळवळ आणि तिच्या प्रगतीबाबत बोलताना शहा म्हणतात  कि, ‘ तुम्ही कधी माझ्या ऑफिसमध्ये चहासाठी आलात तर देशभरातील सहकारी संस्थांचा लेखा जोखा तुम्हाला पाहायला मिळेल.” सहकार चळवळ प्रत्येक गावात पोहोचवणे हेच आमचं ध्येय असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा :

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यात बदल ; चिंचवडमधील कार्यक्रमानंतर तातडीने होणार दिल्लीला रवाना

महाराष्ट्राची भूमी ही सहकाराची भूमी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Back to top button