Sangli crime news : मिरज येथे वडिलाकडून मुलाचा निर्घृण खून; मृतदेहाचे केले तुकडे | पुढारी

Sangli crime news : मिरज येथे वडिलाकडून मुलाचा निर्घृण खून; मृतदेहाचे केले तुकडे

मिरज : पुढारी वृत्तसेवा : कर्जबाजारी मुलाला कंटाळून बापानेच मुलाचा निर्घृणपणे खून केला. कटरच्या साह्याने त्याच्या शरीराचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहित राजेंद्र हंडीफोड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून निम्मा भाग मिरजेतील गणेश तलावात फेकून देण्यात आला आहे. तर निम्मा भाग सुभाषनगर येथे स्वतःच्या प्लॉटमध्ये ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी राजेंद्र यल्लप्पा हंडीफोड हा स्वतःहून पोलिसांत हजर झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

गणेश तलावामध्ये खून झालेल्या तरुणाचे हात पाय आणि मुंडके फेकून दिले आहे. तर उर्वरित धड हे सुभाषनगर, शिंदे मळा येथील हंडीफोड मळ्यात असलेल्या प्लॉटमध्ये ठेवण्यात आले आहे. घटनास्थळी मिरज शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू आहे. दरम्यान मृत तरुण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button