सांगली : यमगरवाडीच्या जवानाने जम्मू-काश्मीरमध्ये जीवन संपवले | पुढारी

सांगली : यमगरवाडीच्या जवानाने जम्मू-काश्मीरमध्ये जीवन संपवले

तासगाव : पुढारी वृत्तसेवा- यमगरवाडी (ता. तासगाव) येथील मयूर लक्ष्मण डोंबाळे (वय २३) या सैन्यदलातील जवानाने शुक्रवारी रात्री जीवन संपवले. या मृत्यू मागचे कारण अस्पष्ट आहे. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. मयूर डोंबाळे रत्नागिरी येथे झालेल्या भरतीत सैन्यदलात रुजू झाला होता. सध्या जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात कार्यरत होता. घरी आई – वडील, एक मोठा भाऊ व एक बहीण आहे. बहिणीचे लग्न झाले आहे.

शुक्रवारी रात्री मयूरने जीवन संपवले. यामागे कोणते कारण आहे, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत मयूर याच्या कुटुंबियांना माहिती दिली. शुक्रवारी सकाळी त्याचे कुटुंबीय जम्मू-काश्मीरला गेले आहेत. उत्तरीय तपासणीनंतर मयूर डोंबाळे याचे पार्थिव त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

आज शनिवार (दि.८) रात्री उशिरापर्यंत मयूरचे कुटुंबीय पार्थिव घेऊन पुण्यात येणार आहेत. तर उद्या (रविवारी) सकाळी ते मूळ गावी यमगरवाडी येथे पोहोचतील. त्यानंतर त्याच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Back to top button