सांगली : जत येथील सराफ दुकानातून भरदिवसा सव्वा लाख किमतीचे दागिने लंपास : दोन अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : जत येथील सराफ दुकानातून भरदिवसा सव्वा लाख किमतीचे दागिने लंपास : दोन अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल

जत; पुढारी वृत्तसेवा : जत शहरातील एका सराफ ज्वेलर्समध्ये सोने घेण्याच्या बहाणा करत दोन महिलांनी सव्वा लाख किंमतीचे गंठण लंपास केले आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता घडली आहे. याबाबतची फिर्याद प्रकाश शिवाप्पा बंडगर यांनी जत पोलिसात दिली आहे. पोलिसांनी अनोळखी दोन महिलेवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा चोरीच्या या प्रकाराने खळबळ परिसरात उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जत शहरातील मंगळवार पेठेत चोरट्यांचा सुळसुळाट आहे. दररोज चोरीचे प्रकार सरास घडत आहेत. दरम्यान गुरूवारी सकाळी बंडगर यांच्या ज्वेलर्समध्ये सोने घेण्याच्या उद्देशाने दोन अनोळखी महिला आल्या होत्या. यावेळी गर्दी दुकानात देखील होती. या गर्दीतच या दोन महिलांनी सोने चे दागिने लंपास केले आहेत. याबाबतची दृश्य सीसीटीव्हीच्यामध्ये कैद झाले आहेत. या घटनेचा जत पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा;

Back to top button