स्थानिक विकास निधीतून जत तालुक्याला दीड कोटीचा निधी मंजूर: गोपीचंद पडळकर | पुढारी

स्थानिक विकास निधीतून जत तालुक्याला दीड कोटीचा निधी मंजूर: गोपीचंद पडळकर

जत : पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी स्थानिक विकास निधीतून दीड कोटीचा निधी मंजूर केला आहे. प्रस्तावित मंजूर कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. लवकरच मंजूर कामांची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
खालील कामांना स्थानिक विकास निधीतून निधी मंजूर झाला आहे.

(कंसात मंजूर रक्कम) उमदी येथे ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत सभामंडप बांधणे (१० लाख), साळमाळगेवाडी येथे ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत सभामंडप बांधणे, (१० लाख), संख येथे खुल्या जागेत सभामंडप बांधणे (१० लाख), वळसंग येथे ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत सभामंडप बांधणे (१० लाख), बिळूर येथे सभामंडप बांधणे (१० लाख), जिरग्याळ येथे ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत सभामंडप बांधणे (१० लाख), उमराणी येथे खुल्या जागेत सभामंडप बांधणे (१० लाख), बिरनाळ येथे ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत सभामंडप बांधणे (१० लाख), खलाटी येथे सभामंडप बांधणे (१० लाख), लवंगा येथे सभामंडप बांधणे (१० लाख), करेवाडी (को.बोबलाद ) येथे ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत सभागृह बांधणे (१० लाख ), मुचंडी येथे ग्रामपंचायत हद्दीत सभामंडप बांधणे (१० लाख ), सोन्याळ येथे सभामंडप बांधणे (१० लाख ), अंकले येथे ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत सभामंडप बांधणे (१० लाख), बाज येथे सभामंडप बांधणे (१० लाख) असे एकूण १५ कामांसाठी दीड कोटीचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित कामाना देखील प्राधान्य देणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

जत येथील पुतळा करण्यासाठी दीड कोटीचा निधी मंजूर

आ. गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जत तालुक्याला भरीव निधी प्राप्त होत आहे तसेच तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडत आहेत. जिल्हा नियोजन समितीमध्ये अगदी आक्रमकपणे तालुक्यातील प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. दरम्यान, आ. पडळकर यांच्या प्रयत्नातून जत शहरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळा सुशोभीकरण व जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी दीड कोटीचा निधी मंजूर केलेला आहे.

हेही वाचा 

Back to top button