सांगली : नागज फाटा येथे जेवणासाठीचा अनाधिकृत एस.टी.बस थांबा कधी होणार बंद? | पुढारी

सांगली : नागज फाटा येथे जेवणासाठीचा अनाधिकृत एस.टी.बस थांबा कधी होणार बंद?

सांगली, पुढारी वृत्‍तसेवा : सांगली जिल्‍हातील नागज फाट येथे अनाधिकृतपणे जेवणासाठी एस.टी.बस थांबा आहे. हॉटेल सुनिल ढाबा असे या थांब्‍याचे नाव असून यावर सांगली, सांगोला, आणि सोलापूर या भागातून अधिकृत एस.टी.चा थांबा असलेल्‍या हॉटेल चालकांनी निवेदन, तक्रारी अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई येथे देण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, एस.टी.चा जेवनासाठीचा थांब्‍याला एस टी महामंडळाकडून परवानगी घ्‍यावी लागते. ही परवानगी देत असताना एस टी कडून अनेक बाबी तपासल्‍या जातात. परंतु नागज फाट येथील ढाब्‍याचे कोणतीच अधिकृत परवागणी नाही. याबाबत अधिकृत हॉटेल चालकांनी सांगली, सोलापूर येथील एस टी महामंडळाचे मुख्य कार्यालयात लेखी व तोंडी तक्रारी दिल्‍या आहे.

दरम्‍यान, नागज फाटयाजवळील हा ढाबा नियमित सुरूच आहे. चालक-वाहक बसेस थांबवण्यासाठी त्‍यांना नॉन व्हेज जेवनासोबतच टीप दिली जाते. यामूळे अनेक चालक-वाहक परवानगी नसताना येथे बसेस थांबवतात. अशा चालक-वाहकाविरूद्‌ध महामंडळाकडून दंड आकरण्यात आली होती, अशी माहिती अधिकृत हॉटेल चालकांनी दिली.

तसेच, या ढाबा चाहकांस काही लोकांनी अनाधिकृत सुरू असलेली हा बाब थांबवण्यास सांगितले असता उलट त्‍याने त्‍याना अरेरावी करत दमदाटी केली. तरी या ढाबा चालकांवर तात्‍काळ कारवाई करून हा अनाधिकृत ढाबा बंद करण्याची मागणी अधिकृत हॉटेल चालकांनी केली आहे.

आम्‍ही त्‍यांना तोंडी व लेखी ढाबा बंद करण्यास माहिती दिली. यावर त्‍याने आम्‍हाला दम देत अरेरावी केली. आणि मी हे बंद करणार नाही असे सांगितले.

– अधिकृत हॉटेल चालक

सोलापूर-कोल्‍हापूर या मार्गावर तक्रारीबाबत विभागातील आगार व्यवस्थापक यांचेमार्फत संबंधीत चालक वाहकांना या मार्गावरील नागज फाटा या ठिकाणी अनधिकृत हॉटेलवर बस नयेत याबाबत सक्त सूचना देणेत आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी पुनश्च उद्भवणार नाहीत याची कटक्षाने काळती घ्‍यावी असे लेखी रा.प.कार्यालयांना सूचना करण्यात आले आहेत.

– रा.प.कोल्‍हापूर विभाग

 

 

Back to top button