सांगली: विटा येथे फ्लेक्स फाडल्याप्रकरणी ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांची निदर्शने | पुढारी

सांगली: विटा येथे फ्लेक्स फाडल्याप्रकरणी 'रिपाइं' कार्यकर्त्यांची निदर्शने

विटा : पुढारी वृत्तसेवा : विटा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचा फ्लेक्स फाडल्याप्रकरणी रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२९) जाहीर निषेध करण्यात आला. तसेच येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करून समाजकंटकांना अटक करा, अशा घोषणा देण्यात आल्या.

विट्यातील तासगाव रस्त्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चा फ्लेक्स लावण्यात आला होता. मात्र, मंगळवारी हा फ्लेक्स अज्ञातांनी फाडला. यावरून रिपाइंचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी ही बाब पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या निदर्शनास आणू दिली होती.

खरात म्हणाले, विटा शहरामध्ये पक्षाच्या बोर्डाची विटंबना करून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न आहे. या घटनेची सखोल चौकशी करून समाजकंटकास तत्काळ अटक करून कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

अॕड. तुषार लोंढे, नवनीत लोंढे, हणमंत खिलारी, चंद्रकांत कांबळे, शरद घाडगे, सुरेंद्र कांबळे, रणजीत आईवळे, विशाल काटे, बशीर मुजावर, मच्छिंद्र यादव आदीसह कार्य कर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button