सांगली: जत येथे टँकरच्या धडकेत दुचारीस्वाराचा जागीच मृत्यू | पुढारी

सांगली: जत येथे टँकरच्या धडकेत दुचारीस्वाराचा जागीच मृत्यू

जत; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या विजापूर – गुहागर राष्ट्रीय मार्गावर एमआयडीसीजवळ दुधाचा टँकर व मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. पांडुरंग तुकाराम जानकर (वय ३७, रा. कंठी) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची नोंद जत पोलिसांत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुधाचा टँकर नागज फाटयाकडून जतजवळील एमआयडीसीतील चिलिंग प्लॅन्टकडे जात होता. तर पांडुरंग मोटरसाकलवरून आपल्या घरी कंठीकडे जात होता. यावेळी टँकर व मोटरसायकल यांच्यात धडक झाल्याने जानकर हे रस्त्यावर पडले. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. पांडुरंग यांच्या मागे वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा 

सांगली: विट्यात ‘यशवंत’ च्या कामगारांनी उभारली काळी गुढी

सांगली : पृथ्वीराज पवार यांना जयंतरावांची कावीळ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका

सांगली : नदी प्रदूषणाला जयंतरावच सर्वाधिक जबाबदार; पृथ्वीराज पवार यांनी विधानसभेत सांगितले अर्धसत्य

Back to top button