सांगली : लाखोंच्या साहित्यासह चोरट्यांनी पळवला ट्रक, आरोपी अटकेत | पुढारी

सांगली : लाखोंच्या साहित्यासह चोरट्यांनी पळवला ट्रक, आरोपी अटकेत

जत, पुढारी वृत्तसेवा : जत शहरातील एटीएममधून पैसे काढेपर्यंत २६ टन लोखंडी कॉइल घेवून सिनेस्टाईल ट्रकच घेवून पोबारा केल्याची घटना सोमवारी घडली होती. जत पोलिसांनी सापळा मिरजेजवळ ३० लाखाचा ट्रक तसेच ट्रकमधील १८ लाख किमतीची लोखंडी कॉइल ताब्यात घेतली आहे. रविंद्र गिरमल कांबळे (वय-३५, रा.बोलवाड,मिरज ) असे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कर्नाटकातील महादेव गोविंद जमादार (वय ३४, व्यवसाय- चालक रा. चिंचोळी) हे त्यांच्याकडील ट्रकमधून JSW कंपनीची २६ टन वजनाची लोखंडी कॉईल घेवून जत ते विजयपुर रोडने सोमवारी निघाले होते. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास जत- विजयपूर मार्गावरील महाराणा प्रताप चौकात एटीएम सुरू असल्याने पैसे काढण्यासाठी थांबले. एटीएम मधून लगेच पैसे काढून यायचे असल्याने त्यांनी ट्रक बंद केला नाही. ट्रक चालू ठेवून ते एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तीने मुद्देमालासह ट्रकच गायब केला. पैसे काढून बाहेर येवून बघतात तो ट्रकच गायब झाला होता. या घटनेने जत शहरात खळबळ उडाली. महादेव जमादार यांनी या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुद्देमालासह ट्रकच गायब झाल्याने जत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर , जतच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनावाखाली जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर मालासह पळवून नेलेला ट्रक मिरज भागात असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी सापळा रचून ट्रक व ट्रक पळवून नेणाऱ्या रविंद्र कांबळे यास अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास गणेश संकपाळ करीत आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button