सांगली : बेंगलोर -गांधीधाम एक्सप्रेसचे इंजिन फेल | पुढारी

सांगली : बेंगलोर -गांधीधाम एक्सप्रेसचे इंजिन फेल

मिरज, पुढारी वृत्तसेवा : बेंगलोर-गांधीधाम एक्सप्रेसचे इंजिन रविवारी (दि.२५) सातारा स्थानकात फेल झाले. त्यामुळे मिरज स्थानकातून दुसरे इंजिन पाठवून एक्सप्रेस पुढे रवाना करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, बेंगलोर -गांधीधाम एक्सप्रेस रविवारी गांधीधामकडे निघाली होती. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेस सातारा स्थानकात पोहोचल्यानंतर एक्सप्रेसचे इंजिन फेल झाले. त्यामुळे एक्सप्रेस सातारा स्थानकातच थांबवण्यात आली.

याबाबत मिरज जंक्शनला माहिती देण्यात आल्यानंतर मिरजेतून दुसरे इंजिन साताराकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर मिरजेतून गेलेले इंजिन जोडून गाडी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा स्थानकातून पुढे रवाना करण्यात आली. इंजिन फेलमुळे गांधीधाम एक्सप्रेस सुमारे दीड तास सातारा स्थानकात खोळंबली होती. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.

हेही वाचंलत का?

Back to top button