Afghan Women : शिक्षण बंदीनंतर अफगाणमधील तरुणींचा रस्‍त्‍यावर आक्रोश, ”शिरच्छेद केला असता…” | पुढारी

Afghan Women : शिक्षण बंदीनंतर अफगाणमधील तरुणींचा रस्‍त्‍यावर आक्रोश, ''शिरच्छेद केला असता...''

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या अफगाणिस्तानमधील महिलांवर तालिबान राजवटीचा अन्याय सुरु आहे. नुकतेच तालिबान सरकारने महिलांच्‍या महाविद्यालयीन शिक्षणावर बंदी घातली आहे. या जुलमी आदेशाच्‍या निषेधार्थ मागील चार दिवस देशातील महिला रस्‍त्‍यावर उतरुन निषेध करत आहेत. येथील तरुणींचा आक्रोश हा तालिबान सरकारच्‍या दडपशाहीचा पुरावाच देत आहे.

महिलांचा शिरच्छेद करण्याचे आदेश दिले असते तर चांगले झाले असते

 अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, असे मार्चात सहभागी झालेल्‍या मारवा ही १९ वर्षीय तरुणीने म्‍हटलं आहे.   महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेणारी कुटुंबातील पहिली महिला बनण्याचा सन्मान मारवा  मिळणार होता. अवघ्या काही महिन्यांमध्‍येचे तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण होणार होते. मात्र  तालिबानी सरकारच्‍या दडपशाहीमुळे तिचा स्वप्नभं झाला आहे.  शिक्षण बंदी निर्णयाचा निषेध करत स्‍थानिक माध्‍यमांशी बोलतानाती म्हणाली की,  महाविद्यालयीन शिक्षणावरील बंदीपेक्षा सरकारने महिलांचा शिरच्छेद करण्याचे आदेश दिले असते तर चांगले झाले असते.”

“आपण इतके दुर्दैवी आहोत, हे माहित असते तर जन्मालाच आले नसते, अशी माझी इच्छा आहे. जगात माझ्या अस्तित्वाबद्दल मला वाईट वाटते. आम्हाला प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात आहे. प्राणी स्वतःहून कुठेही जाऊ शकतात, पण आम्हा मुलींना घरातून बाहेर पडण्याचा अधिकारही नाही.” अशी खंतही मारवासह मार्चात सहभागी झालेल्‍या तरुणींनी व्‍यक्‍त केली.

मारवाने मार्चमध्ये अफगाणिस्तानच्या राजधानीतील वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंग पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला होता. पण तालिबान सरकारच्या निर्णयामुळे आता तिचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तिच्यासह अफगाणिस्तानच्या अनेक तरुणी याविरोधात आवाज उठवत आहेत.

हेही वाचा

Back to top button