सांगली : आटपाडी दाम्‍पत्‍याने केलेल्या धर्मांतरच्या निषेधार्थ कडकडीत बंद | पुढारी

सांगली : आटपाडी दाम्‍पत्‍याने केलेल्या धर्मांतरच्या निषेधार्थ कडकडीत बंद

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथे गेळे येथील दाम्‍पत्‍याने केलेल्या धर्मांतर प्रकाराच्या निषेधार्थ आज ( दि. २५ ) आटपाडी शहर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते.

आटपाडी शहरातील आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णावर जादूटोणा भोंदूगिरीने उपचारासह धर्मांतराचा आरोप असलेला संजय गेळे व अश्विनी गेळे या पती-पत्नीवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ आज आटपाडी शहर बंद ठेवण्यात आले. बाजारपेठ बंद असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्‍यात आला होता.

आटपाडी शहरात धर्मातर जादूटोणा अंधश्रद्धा या विषयावरून मोठा गदारोळ सुरू आहे. गेळे दांपत्याने जादूटोणा करून पेशंट बरा करण्याच्या उद्देशाने वरद हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये रुग्‍णाच्‍या कपाळावरून बोटे फिरवून टॅबमधील मजकूर वाचून बोटाने शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवले होते. याबाबत जादूटोणा, भोंदूगिरी केल्याची फिर्याद संपतराव नामदेव धनवडे यांनी दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. धर्मांतराचा विषय गंभीर असूनण त्या अनुषंगाने कारवाई करावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

हेही वाचा  :

Back to top button