सांगली : विट्यातील महसूल विभागाच्या सेतू कार्यालयात लाचलुचपतची धाड; महिलेसह एकास अटक | पुढारी

सांगली : विट्यातील महसूल विभागाच्या सेतू कार्यालयात लाचलुचपतची धाड; महिलेसह एकास अटक

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यातील महसूल विभागाच्या सेतू कार्यालयात एक हजार सातशे रुपयांची लाच घेताना महिला कर्मचाऱ्याला सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. पूजा किशोर साळुंखे (वय ५२) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला सेतू कार्यालयातील संगणक चालक असून तिचा मुलगा प्रतिक किशोर साळुंखे (वय २८, दोघे रा. सावरकरनगर, विटा, ता. खानापूर) याच्यामार्फत लोकांकडून पैसे घेत असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाच्या नावाचे नॉन क्रिमिलेयर दाखल्याचे प्रकरण प्रांत कार्यालयास पाठवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अंतर्गत सेतू कार्यालयामधील महिला संगणक चालक पूजा साळुंखे यांनी २ हजारांची मागणी केली. त्यावर संबंधित तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोमवरी तक्रार दिली होती. या नुसार सोमवार आणि आज, मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली.

यावेळी पूजा साळुंखे यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती १ हजार ७०० रुपयेवर हा व्यवहार ठरला. यानंतर मंगळवारी दुपारी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचला. साळुंखे यांनी ठरलेली लाचेची रक्कम तिचा मुलगा प्रतिक किशोर साळुंखे यांचेकडे देण्यास सांगितली. त्याप्रमाणे प्रतिक साळुंखे लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्विकारल्यानंतर दोघांनाही रंगेहाथ पकडले.

.हेही वाचा  

मेट्रोचा ‘डबल डेकर व्हायाडक्ट’ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये; एकाचवेळी दोन मार्गांवर वाहतूक

संगमनेरात पोलिसांनी पकडले 2 लाखांचे 1 हजार किलो गोमांस

नाशिक : ट्रकच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Back to top button