नाशिक : ट्रकच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

नाशिक : ट्रकच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू
Published on
Updated on
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा 
सिमेंटची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक खाली एका चार वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार खरजुल मळा परिसरातील मालधक्का रस्त्यावर घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर ट्रकसह फरार झाला.
अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव अमित करणजीलाल धुर्वे आहे. अमित त्याच्या काकांकडे गेला होता. त्याला परत घेऊन आणण्यासाठी पायाने अपंग असलेले वडील करंजीलाल दुर्वे हे भावाच्या सायकलवर अमितला घेऊन येत होते. यावेळी खरजुल मळा परिसरातील मालधक्कारोड वरून समोरून येणाऱ्या सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकची त्यांच्या सायकलला जबरदस्त धडक बसल्याने अपघात झाला. ट्रकच्या मागील चाकाखाली अमित सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन फरार झाला आहे. नाशिकरोड पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे पुढील तपास करत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news