पुणे विमानतळाचा विकास मोठ्या प्रमाणावर होणार : ज्योतिरादित्य सिंधिया | पुढारी

पुणे विमानतळाचा विकास मोठ्या प्रमाणावर होणार : ज्योतिरादित्य सिंधिया

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मागच्या आठवड्यात पुण्यात विमानतळावरील मल्टीमोडल पार्कींगच्या उदघाटनासाठी आलो होतो. या पार्कींगमुळे विमान प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. त्यासोबतच पुणे विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांमध्ये वाढ होत आहेत. आगामी काळात येथील नवीन विमानतळ टर्मिनल लवकरच खुले होईल आणि कार्गो सेवेचा सुध्दा विस्तार होईल. यामुळे पुणे विमानतळाच्या विकासासोबतच शहराचा सुध्दा विकास होणार आहे, असे मत केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले.

पुणे-सिंगापूर या आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या उदघाटनप्रसंगी ज्योतिरादित्य सिंधिया ऑनलाईन उपस्थित राहून बोलत होते. यावेळी पुणे विमानतळावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष व खासदार गिरीश बापट, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, विस्ताराचे सीईओ विनोद कन्नन, एअरमार्शल भूषण गोखले मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रशांत गिरबाने, सुधीर मेहता, यांच्यासह विमानतळावरील अधिकारी आणि विमान कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

सिंधिया म्हणाले, पुणे हे माझे शहर आहे, हे देशाचे शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र सुध्दा आहे. मराठा साम्राज्याचा सूर्य येथूनच उगवला. या शहराच्या प्रत्येक कणा-कणात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हिंदवी स्वराज्याचे मुळ पुणे शहर आहे. याशिवाय राष्ट्रवाद, साम्राज्यवादाचे केंद्र देखील आहे. या पुणे शहराची आणि पुणेकरांची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला अभिमान आहे.

विनोद कन्नन म्हणाले, आजचा दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे. पुणे सिंगापूर ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे आनंद होत आहे. संतोष ढोके म्हणाले, रात्रीपासून पुणे-सिंगापूर सेवा सुरू होत आहे. आठवड्यातून 4 दिवस या सेवेचा पुणेकर प्रवाशांना फायदा होणार आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवारी आणि रविवारी पुण्यातून पुणे-सिंगापूर विमानांची उड्डाणे होतील.

हेही वाचलंत का?

Back to top button