मिरजेत सहा बालविवाह रोखले : छापा टापून पोलिसांची कारवाई : दोन अल्पवयीन मुली ताब्यात | पुढारी

मिरजेत सहा बालविवाह रोखले : छापा टापून पोलिसांची कारवाई : दोन अल्पवयीन मुली ताब्यात

मिरज; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका परिसरामध्ये होणारे सहा बालविवाह चाईल्ड लाईन आणि मिरज शहर पोलिसांच्या पथकाने रोखले. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री सहा बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईन संस्थेला मिळाली होती. त्यानुसार लग्नासाठी सहा मुली संबंधित ठिकाणी दाखल झाल्या होत्या. ही माहिती मिळतात मिरज शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. चाईल्ड लाईन संस्था आणि पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे. तर एका मुलीने घटनास्थळावरून पलायन केले. तर यापैकी तीन मुलींचे वय पूर्ण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

ही कारवाई जिल्हा बाल कल्याण समिती सांगली सदस्य कालिदास पाटील, निवेदिता ढाकणे, आयुष्यात दानवाडे, दिलीप खैरमोडे, शिवकुमार ढवळे, तहसीलदार डी एस कुंभार, महापालिका उपायुक्त यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

अधिक वाचा :

Back to top button