सांगली : शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या प्रलंबित पावत्या एका महिन्यात देणार : किशोरी करमुसे | पुढारी

सांगली : शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या प्रलंबित पावत्या एका महिन्यात देणार : किशोरी करमुसे

विटा : पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीच्या प्रलंबित पावत्या एका महिन्यात देणार आहोत, अशी ग्वाही जिल्हा वेतन आणि भविष्य निर्वाह निधी अधिक्षक किशोरी करमुसे यांनी दिली. आदर्श माध्यमिक विद्यामंदिर येथे खानापूर, आटपाडी आणि कडेगाव या तीन तालुक्यातील माध्यमिकचे मुख्याध्यापक आणि क्लार्क यांचे भविष्य निर्वाह निधी तसेच सारथी शिष्यवृतीचे प्रस्ताव सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक- शिक्षकेतर संघटनेच्या वतीने प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यानंतर खानापूर, आटपाडी आणि कडेगाव तालुक्यांची भविष्य निर्वाह निधी प्रशिक्षण आणि सारथी शिष्यवृती सभा पार पडली. या सभेत जिल्हा वेतन आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक किशोरी करमुसे बोलत होत्या. यावेळी बाकी काही वेतन पथकातील समस्येबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच भविष्य निर्वाह निधी सॉफ्टवेअरची माहिती देवून सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.

प्रारंभी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी संतोष नाईक यांनी सर्वांचे स्वागत करून सारथी शिष्यवृतीबाबत महाराष्ट्रात सांगली जिल्हा सर्वांच्या आहे. भविष्यातही तो असाच सातत्याने पुढे राहणे महत्वाचे आहे. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अमृतकुमार पांढरे आणि राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे विद्या समितीसह सचिव संजयकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्यरत आहोत. भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाबाबत हे प्रशिक्षण आपण काळजीपूर्वक करावे असे आवाहन नाईक यांनी केले.

यावेळी खानापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष धनवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जयवंत जाधव, रमेश कोष्टी, संजयकुमार साठे यांचीही भाषणे झाली. खानापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव राजाराम घाडगे यांनी आभार मानले. सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डी. पी. कुलकर्णी, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिंदे, श्रीकांत पाटील आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने मुख्याध्यापक तसेच क्लार्क उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button