इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार (व्हिडिओ व्हायरल) | पुढारी

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार (व्हिडिओ व्हायरल)

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : येथे कव्वाली कार्यक्रमाच्या मंचावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पिरअली पुणेकर यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार चार दिवसापूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आता पोलीस काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पैगंबर जयंतीनिमित्त ख्वाजा गरीब नवाज सोशल वेलफेअर ट्रस्टच्या वतीने सोमवार (दि१०) रोजी रात्री आमिल आरिफ साबरी यांचा बज्मे कव्वालीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमवेळी पुणेकर यांनी आपल्या परवानाधारक रिव्हा़ँलवरमधून स्टेजवरुनच हवेत गोळीबार केला.

पीरअली पुणेकर नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. पूर्वीच्या वादातून पुणेकर यांचे मोमीन मोहल्ला परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यालय फोडण्यात आले होते. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांशी त्यांचा जोरदार वाद झाला होता. त्यामुळे पुणेकर अन् वाद हे समीकरण बनले आहे. चार दिवसांपूर्वी मोमीन मोहल्ला येथे कव्वालीचा कार्यक्रम चांगलाच रंगला होता. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कवालीच्या मंचावरूनच त्यांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

हे वाचलंत का?

Back to top button