सांगली: तासगावच्या पोलीस निरीक्षकांना फुलांच्या बरसातीत निरोप (Video) | पुढारी

सांगली: तासगावच्या पोलीस निरीक्षकांना फुलांच्या बरसातीत निरोप (Video)

तासगाव: पुढारी वृत्तसेवा: तासगाव येथील पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांची सोमवारी मिरज शहर पोलीस ठाण्यात बदली झाली. यानिमित्ताने मंगळवारी आयोजित निरोप समारंभ तासगावच्या इतिहासात भूतो न भविष्यती, असा करण्यात आला. झाडे यांना निरोप देताना त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर फुलांची बरसात करण्यात आली. तर खुल्या जीपमधून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. हा अनोखा निरोप समारंभ परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

गेल्या दीड वर्षापूर्वी झाडे हे पोलीस निरीक्षक म्हणून तासगाव येथे कार्यरत आहेत. अनेक गंभीर घटना, खून, मारामाऱ्या, दरोडा, चोरी, आदी घटनांचा त्यांनी कौशल्याने तपास करत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले. गुन्हे अन्वेषण विभागाला मोठी ताकद दिली. शहरात विविध कार्यक्रम शांततेत साजरे होण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता.

सोमवारी संजीव झाडे यांची मिरज शहर पोलीस ठाण्यात बदली झाली. यानंतर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी मिळून त्यांना अनोख्या पद्धतीने निरोप दिला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button