सांगली : कडेगावात अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार; संशयिताला अटक | पुढारी

सांगली : कडेगावात अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार; संशयिताला अटक

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा; येथील अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अचानकपणे घरात शिरून मुलीवर अत्‍याचार केल्‍याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी संशयित आरोपी सचिन सुरेश पवार (रा. निमसोड ता. कडेगाव) या नराधमाच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असू, त्‍याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अल्पवयीन पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान या घटनेचा कडेगाव शहरासह परिसरात निषेध व्यक्त केला जात आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना संशयित आरोपीने एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यात पीडितेच्या राहत्या घरी तिचे आई वडील घराबाहेर दुकानात गेले असल्याचे व घरी कोणी नसल्याचे पाहून दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. पीडिता एकटीच घरी असल्याचे पाहून संशयित आरोपी सचिन पवार याने बळजबरीने तू मला आवडतेस असे म्हणत पीडितेवर अत्‍याचार केले.

त्यानंतर सदरचा प्रकार कोणास सांगितला तर तुला तसेच तुझ्या आई व वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. त्यांनतर जुलै 2022 मध्ये एके दिवशी पीडित मुलगी कराड येथे कॉलेजला एसटी बसने जात असताना संशयित आरोपीने बसचा पाठलाग केला. कराड- सैदापूर कॅनोल जवळ बसमधून पीडिता खाली उतरल्‍यानंतर तीच्या जवळ येवून संशयित पवार याने फोन का उचलत नाही म्‍हणत पीडितेला शिवीगाळ केली. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button