Omicron BA.4.6 : इंग्लंडमध्ये पसरतोय कोविड ओमयक्रॉनचा नवा व्हॅरिएंट | पुढारी

Omicron BA.4.6 : इंग्लंडमध्ये पसरतोय कोविड ओमयक्रॉनचा नवा व्हॅरिएंट

पुढारी ऑनलाईन डेस्क : covid variant omicron BA.4.6 : कोरोनाची साथ जगभरात नियंत्रणात येत असल्याचे चित्र असले तरी याचा धोका अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. कारण इंग्लंडमध्ये कोरोनाचा व्हॅरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या सबव्हॅरिएंटचा फैलाव होत आहे. या सब व्हॅरिएंटला BA.4.6 असे नाव देण्यात आले आहे.

ओमायक्रॉनमुळे फार गंभीररीत्या आजारी पडण्याची उदाहरणे कमी असल्याने हा सबव्हॅरिएंटही तसाच सौम्य प्रकारातील असेल, असे संशोधकांना वाटते. युनायटेड किंगडम हेल्थ सिक्युरिट एजन्सीच्या हवाल्याने NDTVने ही बातमी दिली आहे. लंडनमध्ये ज्या सँपलमध्ये डीएनए सिक्वेन्सिंग केले गेले, त्यातील 9 टक्के रुग्ण ओमायक्रॉनच्या या सब व्हॅरिएंटची असल्याचे दिसून आले आहे. (covid variant omicron BA.4.6)

ओमायक्रॉन अर्थात BA.4 हा कोव्हिडचा व्हॅरिएंट जानेवारी 2022 दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम दिसून आला होता. लंडनमध्ये आता BA.4.6 हा जो सबव्हॅरिएंट मिळाला आहे, तो कोव्हिडिच्या दोन वेगवेगळ्या व्हॅरिएंटपासून बनलेला असण्याची शक्यता आहे. अशा व्हॅरिएंटला Recombinant व्हॅरिएंट असे म्हटले जाते.

युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डने ओमायक्रॉनच्या या सबव्हॅरिएंटविरोधात फायझरची लस कमी अँटिबॉडी निर्माण करते असे म्हटलेले आहे, म्हणजे कोव्हिड लस या सबव्हॅरिएंटला फार प्रभावी नसतील, असे NDTVच्या वृत्तात म्हटले आहे. पण ओमायक्रॉन आणि मूळ व्हायरस या दोन्हींवर प्रभावी ठरणारे बुस्टर डोस प्रभावी ठरू शकतील, असा अंदाज आहे. (covid variant omicron BA.4.6)

कोरोनाचे जे व्हॅरिएंट आहेत, त्याविरोधात मल्टीव्हॅलिएंट लस जास्त प्रभावी ठरतात. अशा लस विविध व्हॅरिएंटवर प्रभावी ठरतात. त्यामुळे लसीकरण हे कोरोना विरोधातील सर्वांत महत्त्वाचे शस्त्र आहे, तसेच नव्या व्हॅरिएंटवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. (covid variant omicron BA.4.6)

Back to top button