

पुढारी ऑनलाईन डेस्क : टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने नुकतेच नव्या 'अर्बन क्रुझर हायरायडर' (Toyota Urban Cruiser Hyryder) या एसयुवी कारचे लॅान्चिंग केले. या कारच्या किमतीची देखील यावेळी घोषणा करण्यात आली. या एसयुव्हीच्या वेगवेगळ्या मॅाडेलनूसार त्याच्या किंमती आहेत. याचे बुकिंग देखील सुरू केले असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. मध्यम आकाराच्या या एसयुव्ही कारची आकर्षक अशी फिचर्स आहेत.
15 लाख रूपयांपासून 18 लाखा रूपयांपर्यंतच्या वेगवेगळ्या रेंजमध्ये ही कार उपलब्ध असेल. पेट्रोल इंजिन असणाऱ्या मॅाडेलची किंमत ही 17.09 लाख इतकी असणार आहे. V eDrive 2-hybrid, G eDrive 2- hybrid, S eDrive 2 -hybrid, V AT-hybrid NEO ही अशी या कारची वेगवेळी मॅाडेल्स असणार आहेत. (Toyota Urban Cruiser Hyryder)
अॅटोमॅटिक ट्रान्समिशनसह सुसज्ज असणारी ही एक हायब्रिड पॅावरट्रेन कार आहे. या कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, एक इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, क्रूझ कंट्रोल आणि 9.0 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. यासह यात अनेक तगडे फीचर्स या एसयुव्हीमध्ये देण्यात आले आहेत.
टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीचे मार्केटींग विभागाचे अधिकारी अतुल सूद यांनी एका मुलाखती या कारच्या किंमतींबाबत माहिती दिली. कंपनी जुलैच्या पहिल्या अठवड्यामध्ये या एसयुव्ही कारच्या लॅान्चिंग आणि बुकिंगविषयी माहिती दिली होती.