विक्रम सावंत यांचा बेहिशोबी पैसा पतसंस्थेत, ईडीची चौकशी करा : विलासराव जगताप

विक्रम सावंत यांचा बेहिशोबी पैसा पतसंस्थेत, ईडीची चौकशी करा : विलासराव जगताप

जत(सांगली), पुढारी वृत्तसेवा : एका बँकेतील क्लार्क ते आमदार पदापर्यंत पोहोचलेल्या आमदार विक्रम सावंत यांची ईडीमार्फत चौकशी करावी. तसेच सावंत हे माजी मंत्री विश्वजीत कदम यांचे नातेवाईक असून कदम यांचे सासरे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनी लँडिंरगचे धागेदोरे सांगली जिल्‍हातील जतपर्यंत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिवाय सावंत यांनी बेहिशोबी पैसा पतसंस्थेमध्ये ठेवला आहे, असा आरोप भाजपचे नेते विलासराव जगताप यांनी केला आहे.

काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेसने जगताप यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर भाजपनेही थेट आमदार विक्रम सावंत यांच्यावर हल्लाबोल केला.

मनी लॉन्ड्रीरीगमध्ये सावंत याचा हात असून त्याची तक्रार लवकरच करणार आहे. विक्रम सावंत यांचे जवळचे सत्तेचा गैरवापर करत आहेत. तर सावंत हे माजी मंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत. तसेच जतमधील विकासाचे त्‍यांना काहीही देणे घेणे नाही. मंजूर झालेल्या कामाचे नारळ फोडणे, निधीही आणण्याचा आव आणणे व उद्घाटन करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे, असे जगताप म्‍हणाले.

सावंत हे एका बँकेत क्लार्क म्हणून नोकरी करत होते ते आता आमदार झाले आहेत. आमदार झाल्यापासून तालुक्यात लूट सुरू केली आहे. प्रत्येक कामात टक्केवारी सुरू केली आहे. म्हणून जतमध्ये टक्केवारी आमदार म्हणून ओळखले जात आहेत. असे विलासराव जगताप म्‍हणाले.

सावंत यांच्या वडिलांच्या नावे आदर्श घोटाळा यामध्ये प्लॉट आहेत. आणि सध्या त्याची चौकशीही सुरू आहे. बाजार समितीच्या सत्तेचा दुरुपयोग केला आहे. बाजार समितीच्या उमदी जमिनी खरेदी प्रकरणात मोठा गाळा ठेवला आहे. तसेच जनावर बाजार आवारात त्यांनी चार कोटींचे बेकायदा हॉटेल बांधकाम सुरू केले आहे. त्‍याच्या अनेक गोष्‍टीचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते आम्‍ही जनतेच्या समोर आणणार आहेत, असे जगताप म्‍हणाले.

दरम्यान, आज सावंत यांची ईडीमार्फत चौकशी केली पाहिजे कारण जत येथील अनेक ठिकाणी त्यांनी गुंतवणूक केली आहे. तसेच माजी मंत्री विश्वजीत कदम यांचे जवळचे नातेसंबंध आहेत. त्याचीही संपत्ती त्यांच्याकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ईडीने चौकशी केल्यास त्याचे धागेदोरे जत पर्यंत नक्कीच येतील, तर अनेक पुरावे सादर करू असे जगताप म्‍हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news