सांगली: विजेचा धक्का लागून विवाहितेचा मृत्यू; सासू, पतीविरोधात गुन्हा दाखल

सांगली: विजेचा धक्का लागून विवाहितेचा मृत्यू; सासू, पतीविरोधात गुन्हा दाखल

विटा : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील भांबर्डे येथील विवाहिता धनश्री कारंडे (वय ३५) हिचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या प्रकरणी मृत विवाहितेचे वडील आनंदा रामचंद्र गायकवाड (रा. बोरिवली, मुंबई) यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती किशोर अशोक कारंडे आणि सासू कलावती अशोक कारंडे यांच्याविरोधात मानसिक आणि शारीरिक छळ तसेच जाचहाट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा गायकवाड यांची मुलगी धनश्री हिचा विवाह २०१३ साली झाला. मात्र लग्न झाल्यापासूनच पती किशोर आणि सासू कलावती कारंडे हे तिला स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरुन टोमणे मारायचे. तिला गावातील कोणत्याही कार्यक्रमाला जावून द्यायचे नाहीत. कायम तिचा अपमान करायचे आणि घालून पाडून बोलायचे. माहेरच्या लोकांशी तिला फोनवरुन बोलून द्यायचे नाहीत. तसेच तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते.

दरम्यान, गुरूवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास वडील आनंदा गायकवाड यांना विट्यातील अरुण पाखरे यांनी फोनवरून कळविले की, तुमची मुलगी धनश्री हीला विजेचा धक्का लागला आहे. तिला विट्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता आणले असता तिचा मृत झाला आहे. त्यानंतर गायकवाड यांनी सासू कलावती कारंडे व पती किशोर कारंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news