Commonwealth Games 2022 : शाब्‍बास संकेत! प्रतिकूल परिस्‍थितीवर मात करत तू ध्‍येय साध्‍य केलेस

Commonwealth Games 2022 : शाब्‍बास संकेत! प्रतिकूल परिस्‍थितीवर मात करत तू ध्‍येय साध्‍य केलेस

सांगली : पुढारी वृत्तसेवा : ब्रिटनमधील बर्मिंगहम येथे सुरु असणाऱ्या 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगर याने वेटलिफ्टिंग मध्ये रौप्‍य पदकावर मोहर उमटवली. अत्‍यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्‍याने देशासाठी पदक मिळवल्याने सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. संकेत हा हिंदकेसरी स्वर्गीय मारुती माने यांच्या नंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ( Commonwealth Games 2022 ) सहभाग घेणारा सांगलीतील दुसरा खेळाडू आहे. १९७० मध्‍ये मारुती माने यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. सांगलीकरांना अभिमानाची गोष्ट आहे की, आज तब्बल52 वर्षानी सांगलीच्या एका खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळवले.

सांगली जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचा खेळाडू

संकेत हा सांगली जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचा खेळाडू असून, त्याने 2013 पासून गुरुवर्य दिवंगत कै. नाना सिंहासने यांचे सांगलीतील सुप्रसिद्ध दिग्विजय वेटलिफ्टिंग इंस्टिट्यूटमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या साधारण 13व्‍यावर्षी वेटलिफ्टिंग धडे घ्यावयास सुरुवात केली. खेळाचा पाया भक्कम झाल्यावर साल 2017 पासून त्याने शिवछत्रपती पुरस्कार विजेते मयूर सिंहासने ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील धडे घ्यावयास सुरुवात केली. सध्या दिग्विजय वेटलिफ्टिंग इंस्टिट्यूट मध्ये चीफ कोच असलेले मयूर सिंहासने यांची 2010 ची दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा काही अपरिहार्य कारणामुळे हातातून गेल्याचे शल्य त्‍यांच्‍या मनात होते. 2017 पासूनच बर्मिंगहम 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपल्या दिग्विजय वेटलिफ्टिंग इंस्टिट्युटच्या खेळाडूला मिळवून द्यायचेच, असे ध्‍येय त्‍याने ठेवले होते.

प्रचंड मेहनत, राष्‍ट्रीय स्‍पर्धांमध्‍ये चकमदार कामगिरी

संकेतच्या ट्रेनिंगची दीर्घकालीन योजना आखली. ट्रेनिंग, डायट, रेस्ट व इंज्युरी मैनेजमेंट ह्याचा योग्य ताळमेळ घालत त्याचा सराव सुरु होता. त्यामुळे त्याने 2018 पासून राज्यस्तरीय स्पर्धेस सहभाग घेण्यास सुरुवात केली. अगदी ऑफ सिजन मध्ये ट्रेनींग शेड्युल प्रमाणे दिवसातून तीन वेळाही त्याचे ट्रेनिंग असायचे. त्याच्या ह्या मेहनतीमुळे 2019 ले 2020 च्या दरम्यान त्याचा परफॉरमंस एकदम उच्च स्तरावर येथून पोहोचला होता. त्याने त्या काळात अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळवले. जानेवारी 2020 ते मार्च 2020 दरम्यान तर सलग 4 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत सुवर्णपदक मिळवून वरिष्ट राष्ट्रीय उच्चांकही नोंदवले. ह्याची दखल घेत संकेतची भारत सरकारची महत्वकांक्षी स्कीम टॉप्स" मध्ये निवड झाली.

दुखापतीवर मात करत पुन्‍हा संकेत मैदानात

ऑगस्ट 2020 ला सरावादरम्यान संकेतच्‍या कमरेत दुखापत झाली. त्याचे निदान झाले स्पॉडीलोलायसिस. ही इंज्युरी इतकी मोठी व घातक असते की, त्याचे वेटलिफ्टींगचे करियर संपुन जाते. त्यावेळी महाराष्ट्राचे वेटलिफ्टींगचे क्रीडा मार्गदर्शक मधुरा टोळे यांनी मुंबईचे डॉ. किरण नारे ह्या स्पोर्ट्स फिजियथेरपिस्टना संपर्क करण्याचा सल्ला दिला. डॉ. किरण नारे यांनी दोन महिने ऑनलाईन एक्सरसाईजने त्याची कंबरदुखी कमी झाली. याच दरम्यान शरीराच्या आतून क्षती भरून निघण्यासाठी दरम्यान नैसर्गिक आहारावर व नैसर्गिक पेयांवर भर देण्यास सांगितले. संकेतने दोन महिने त्याचे पालन केले. पुढील एक्सरे मध्ये स्पॉडीलोलायसिसचे प्रमाण अगदीच नगन्य झाल्याचे दिसून आले. स्पॉडीलोलायसिस कमी होणे हे एक प्रकारे आश्चर्यच होते. मात्र ह्या दरम्यान संकेत चा परफॉरमंस बराच खराब झाला. मसल मास कमी झाला होता. तो भरुन काढणे एक मोठे आवाहन होते; पण हे शिवधनुश्य पेलत नियोजनबद्ध सरावाने तीन महिन्यात म्हणजे संकेतचा फॉर्म परत आणला.

Commonwealth Games 2022 : कोरोना काळात घरात सराव

कोव्हीड व लॉकडाउनच्या काळात संकेतची ट्रेनिंगची व परफॉरमंसची लयबद्धता बिघडली. लॉकडाउनमुळे इंस्टीट्यूट बंद ठेवावी लागली; पण ट्रेनिंगची लयबद्धता राखणे महत्त्‍वाचे असल्याने उपाय म्हणून; मग त्याचे कोच सिंहासने यांनी व्यायामाचे सर्व सामानच त्याच्या घरी पाठवले. पुढे दोन महिने त्याचे ट्रेनिंग फोनवरुन सुरु होते. ट्रेनिंगचे व्‍हिडिओ तो मोबाईल व पाठवत असे. ह्या निर्णयामुळे त्याचा परफॉरमंस व्यवस्थित राहिला.

लॉकडाउनचे संकेत मिळायला लागल्यामुळे संकेतचे नुकसान होवू नए म्हणून टॉप्सला पत्र लिहून संकेतला नॅशनल कॅप मध्ये घेण्याची विनंती केली. त्याप्रमाणे इंडीयन वेटलिफ्टींग फेडरेशनने ब्रुवारी मधे त्याचे नॅशनल कॅप सिलेक्शनचे पत्र पाठवले. ब्रुवारी 2022 ला सिंगापुर इंटरनेशनल मधे त्याने नविन राष्ट्रकुलचे उचांक नोंदवत 2022 बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेमधे आपले स्थान पक्के करत सिल्व्हर मेडलवर आपले नाव कोरले. जुन्या दुखापतीने स्पर्धेत पुन्हा डोके वर काढल्याने त्याचे सुवर्णपदक हुकले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news