सांगली: पालिका निवडणुकीसाठी तयारीस लागा : पालकमंत्री जयंत पाटील | पुढारी

सांगली: पालिका निवडणुकीसाठी तयारीस लागा : पालकमंत्री जयंत पाटील

विटा पुढारी वृत्तसेवा : विटा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आहे. त्यामुळे विट्यातील निवडणूक ताकदीने यशस्वी करण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

विटा शहरात माजी आमदार पाटील गटाने आगामी पालिकेची निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवण्याचे ठरविले आहे. याबाबत मंत्री पाटील यांच्याशी या गटाच्या नेत्यांची चर्चा झाली. यावेळी पाटील बोलत होते. माजी आमदार सदाशिवराव पाटील, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेतली. तसेच विविध बाबींवर चर्चा केली. यानंतर पाटील बोलत होते.

यावेळी ना. पाटील यांनी निवडणुका राष्ट्रवादीच्या चिन्हावर ताकदीने लढविण्याचे नियोजन करणार आहोत, असे स्पष्ट केले. यावेळी किरण तारळेकर, विश्वनाथ कांबळे, सचिन शितोळे, अविनाश चोथे आदी कार्यकर्तेही उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button