सांगली : वाळवा तालुक्यात पावसाचे आगमन | पुढारी

सांगली : वाळवा तालुक्यात पावसाचे आगमन

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यात शनिवारपासून मान्सून पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या आगमनामुळे आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच पावसामुळे खोळंबलेल्या खरीप पेरण्यांनाही पुन्हा सुरूवात होत आहे.

वाळवा तालुक्यातील येलूर, इटकरे, येडेनिपाणी, कुरळप, ऐतवडे खुर्द या परीसरात जोरदार पाऊस सुरु आहे. शनिवारी साडे अकरा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जास्त अधिक जोर होता. भरुन आलेले आभाळ व पावसाच्या सरी यामुळे गेले काही दिवस उष्णतेने हैरान झालेल्या नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर खोळंबलेल्या खरीप पेरण्यांना शेतकरी पुन्हा सुरुवात करतील.

हेही वाचलंत का ? 

Back to top button