सायली म्हेत्रेचे यूपीएससी परीक्षेत यश, देशात मिळवली ३९८ वी रँक; पलूसच्या शिरपेचात मनाचा तुरा

सायली म्हेत्रेचे यूपीएससी परीक्षेत यश, देशात मिळवली ३९८ वी रँक; पलूसच्या शिरपेचात मनाचा तुरा

पलूस; पुढारी वृत्तसेवा : यूपीएससी परीक्षेत पलूस तालुक्यातील अवघ्या २४ वर्षीय सायली नारायण म्हेत्रे या विद्यार्थिनीने देशात ३९८ वी रँक मिळवली. तिच्या या यशाने पलूसच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे.

सायली मूळची पलूसची. तिचे वडील किर्लोस्कर कंपनीत कामाला असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पलूस येथेच पार पडले. यानंतर २००३ साली वडील नारायण म्हेत्रे हे पुण्याला एका खासगी कंपनीत नोकरीनिमित्त गेले. यामुळे सायलीचे माध्यमिक शिक्षण राजश्री शाहू विद्यामंदिर (आंबेगाव पठार) येथे पूर्ण झाले. यानंतर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय आणि अभियांत्रिकी शिक्षण पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पुटर टेकनॉलॉजी  येथून इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशनमधून पूर्ण केले.

सायलीला दहावीला ९२ टक्के गुण होते. ती लहानपनापासूनच हुशार असल्याने तिला घरातून पूर्ण सहकार्य होते. यासाठी तिने अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षीच यूपीएससी करण्याचे ठरवले. यानंतर अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने युनिक अकॅडमी पुणे येथे यूपीएससी परीक्षेचा सरावासाठी क्लास लावला. तेथे तिने १४ तास अखंड अभ्यास केला. पण २०१९ साली तिला पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही.

यानंतर २०२० साली तिने दुसऱ्या प्रयत्नात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तिन्ही राउंड पास होऊन तिने ५५९ वी रँक मिळवली होती. यातून तिला इंडियन डिफेन्स अकोऊंट सर्व्हिस या पदावर नियुक्तीचे आदेश आले. पण तिला आयएएस व्हायचं असल्याने तिने विशेष सुट्टी घेऊन नंतर २०२१ साली झालेल्या मुख्य परीक्षेत तिने म्हणजे, आता ३९८ वी रँक मिळवली आहे, यातूनही जर आयएएसपदी नियुक्ती नाही मिळाली तरीही ती पुढे प्रयत्न करणार असल्याचे तिचे वडील नारायण म्हेत्रे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

पलूस परिसरातील जास्तीत- जास्त विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत चमकावेत यासाठी पलूस शहरात तशी अद्यावत अभ्यासिका चालू करणार आहे. पुढच्या ५ वर्षात कमीतकमी २० आयएएस अधिकारी घडवायचे आहेत.
– सायली नारायण म्हेत्रे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news