file Photo
file Photo

Sangli : शिराळा येथे टेम्पोच्या धडकेत एक ठार

Published on

शिराळा ः पुढारी वृत्तसेवा येथे दर्शन घेवून आल्यानंतर रस्ता ओलांडताना मालवाहतूक टेम्पोने धडक दिल्याने प्रकाश बळवंत यादव (वय 70, रा. बनेवाडी, ता. वाळवा) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या अपघाताची शिराळा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रकाश यादव हे आपल्या कुटुंबियांसोबत येथे देवदर्शनासाठी आले होते.

यादव हे दर्शन घेऊन बाहेर पडले असता रस्ता ओलांडताना बिऊरकडून इस्लामपूरकडे जाणारी माल वाहतूक गाडी (क्र. एम.एच. 10 सी.आर- 9218) ने त्यांना धडक दिली. या अपघातात यादव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना मालवाहतूक गाडीचे चालक विजय संपत पाटील (वय35, रा. नागराळे, ता. पलूस) यांनी त्यांच्या गाडीतून उपचारासाठी इस्लामपूर येथे दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुरेश नांगरे-यादव यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news