हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या कडेगावचा महाराष्ट्राने आदर्श घ्यावा : डॉ. विश्वजित कदम | पुढारी

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या कडेगावचा महाराष्ट्राने आदर्श घ्यावा : डॉ. विश्वजित कदम

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा : इस्लाम हा शांतीप्रिय धर्म आहे. कडेगाव हे ऐतिहासिक गाव असून हे गाव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. येथे प्रत्येक हिंदू बांधवांच्या सणात मुस्लिम बांधवांचा मान असतो. तर मुस्लीम बांधवांच्या प्रत्येक सणात हिंदू बांधवांचा मान असतो. अशा या शहराचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.

कडेगाव येथे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या वतीने मुस्लिम बांधवांकरीता जंगी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, ज्येष्ठ नेते गुलाम पाटील, भीमराव मोहिते उपस्थित होते.

डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, दिवंगत डॉ. पतंगराव कदम व कदम कुटुंबांचे आणि मुस्लिम समाजाचे वेगळे नाते राहिले आहे. डॉ. कदम यांनी कधीच जात, पात, धर्म, भेदभाव न करता सर्वच जाती धर्माच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यांचा हाच वारसा आम्ही पुढे घेऊन जात असून येथील समाजाच्या प्रत्येक घटकाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगून पवित्र रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, दीपक भोसले, साजिद पाटील, विजय शिंदे, कडेगाव सुन्नी शाही जामा मस्जिदचे पेश इमाम हाफिज मंजर अली, पिर अल्ताफ पिरजादे, बाबासाहेब शेख, सिद्दीक पठाण, सागर सुर्यवंशी, शशिकांत रासकर, मनोज मिसाळ, नासीर पटेल, फिरोज बागवान, खन्ना शेख, मुसा इनामदार आदी हिंदू-मुस्लीम बांधव उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button