सांगली : बुधगावात घरफोडी; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास | पुढारी

सांगली : बुधगावात घरफोडी; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

सांगली ः पुढारी वृत्तसेवा बुधगाव (ता. मिरज) येथे रियाज बालेखान अत्तार यांचे बंद असलेले घर फोडून 3 लाख 34 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि पन्नास हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली. याबाबत त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अत्तार हे बुधगाव येथे स्वामी समर्थ कॉलनीत भाड्याने राहतात. ते कुटुंबासह गावाला गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. अत्तार हे शनिवारी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पाहणी केली.

हेही वाचलतं का?

 

Back to top button