शिराळा तालुक्यातील 17 गावांचा विद्युतपुरवठा खंडित | पुढारी

शिराळा तालुक्यातील 17 गावांचा विद्युतपुरवठा खंडित

कासेगाव : पुढारी वृत्तसेवा
शिराळा उत्तर विभागामध्ये 33 के. व्ही. शिरसी विद्युत उपकेंद्रातील स्ट्रान्स्फॉर्मरमध्ये तांत्रिक कारणाने बिघाड झाल्याने बुधवारपासून (दि. 13) 17 गावांतील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शेती, छोटे उद्योगधंदे बंद पडले आहेत.

पंचवीस वर्षांपूर्वी हा ट्रॉन्स्फॉर्मर बसवला होता. तो सध्या नादुरुस्त आहे. दरम्यान विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नवीन ट्रान्स्फॉर्म बसविण्याचे काम गतीने सुरू आहे. सांगलीहून नवीन ट्रान्स्फॉर्मर शिरसी येथे येईल. त्याचे जोडण्याचे काम झाल्यानंतर विद्युतपुरवठा सुरू होईल, अशी माहिती शाखा अभियंता कैलास जगताप यांनी दिली.मात्र या उपकेंद्रांतर्गत बिघाडामुळे शिरसी, बांबवडे, टाकवे, पाचुंब्री, शिवरवाडी, वाकुर्डे बुद्रुक, अंत्री बुद्रुक, पणुंब्रे, गिरजवडे, घागरेवाडी, धामवडे, कोंडाईवाडी, मानकरवाडी, पाडळी, पाडळीवाडी, औढी, निगडी, अंत्री खुर्द, भैरेवाडी, वाकुर्डेखुर्द, सवादेकवाडी या गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा, छोटे उद्योग, पिण्याचा पाणीप्रश्‍न निर्माण झाला आहे. विजेअभावी ग्रामस्थांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.

Back to top button