सांगली : जतमधील विद्यार्थी युक्रेनमधून परतले; पालकांमध्ये उत्साह | पुढारी

सांगली : जतमधील विद्यार्थी युक्रेनमधून परतले; पालकांमध्ये उत्साह

जत (जि.सांगली), पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्‍हातील जत तालुक्यातील तीन विद्यार्थी वैद्यकिय शिक्षणासाठी युक्रेन देशात गेले होते. तिन्ही विद्यार्थी युक्रेनमधून मायदेशात परतले आहेत. हे विद्यार्थी मायदेशात आल्‍याने त्‍यांच्या पालकांनी निश्वास सोडला. यामध्ये वैष्णवी गणपती शिंदे ( रा. तिप्पेहळळी ) यशराज पराग पवार (जत) यश मनोज पाटील (बिळूर) हे तिघेही युक्रेन येथे अडकले होते. अखेर हे विद्यार्थी सुखरूप पोहोचले आहे.

दरम्‍यान, यशराज पवार, वैष्णवी शिंदे हे दिल्ली विमानतळावर पोहोचले. तेथून ते पुणे येथे आले. तसेच यश पाटील हा विद्यार्थी दिल्ली येथे आला असून रविवारी संध्याकाळी पर्यंत आपल्‍या गावी येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

युद्ध सुरू असलेल्या ठिकाणी मुले अडकल्याने पालक भयभित झाले होते. पालकांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा पोलिसप्रमुख दिक्षीत गेडाम यांनी जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांच्याविषयी सविस्तर माहिती घेतली होती. राज्य व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सहकार्य केले. युद्ध सुरू असलेल्या युक्रेनमधून आपल्‍या देशात हे तिनही विद्यार्थी सुखरूप मायदेशी परत आल्याने पालकांनी सर्वांचे आभार मानले आहे.

हेही वाचा  

Back to top button