SANGALI: बसर्गीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी नराधमास २० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा | पुढारी

SANGALI: बसर्गीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी नराधमास २० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

जत; पुढारी वृत्तसेवा : बसर्गी (ता.जत) (SANGALI) येथे चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या बसर्गी येथील २० वर्षीय किशोर राजेंद्र संकपाळ या नराधमाला सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व पाच हजाराचा दंड ठोठावला आहे.

११ डिसेंबर २०१९ रोजी बसर्गी येथील किशोर राजेंद्र संकपाळ याने आपल्या घराशेजारीच खेळणाऱ्या चार वर्षीय मुलीस आपण खेळायला घरात जावू म्हणून उचलून नेले व तिथे तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किशोर संकपाळ याच्याविरुद्ध जत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची माहिती मिळताच तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी किशोर संकपाळ यास अटक केले होती.


गेल्या काही वर्षांत महिलांवरील आणि विशेषत: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबतचे कायदे अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार, सोळा किंवा त्यापेक्षा कमी वर्षे वय असलेल्या मुलीवरील अत्याचार करणाऱ्याला कमीत कमी २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्याची कायदा दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्तीचा आधार घेत सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाने या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासीची शिक्षा सुनावली.

हेही वाचा

Back to top button