

ऐतवडे खुर्द; पुढारी वृत्तसेवा : वारणा काठी गव्याने मोठी दहशत माजवली आहे. गुरुवारी येलूर येथे दोघा जणांच्यावर गव्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा ऐतवडे खुर्द मध्ये आणखी एकावर गव्याने हल्ला केला. शिवाजी कोंडीबा पाटील असे या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या हल्ल्याच्या सत्रामुळे वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
ऐतवडे खुर्द येथील शेत वस्तीकडे जाणाऱ्या मोळा पानंद वस्तीवर शिवाजी कोंडीबा पाटील हे वैरण आणण्यासाठी गेले असता उसातून अचानक बाहेर आलेल्या गवा रेड्याने हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने एकच आरडाओरड सुरु झाली.
याबाबत शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सरपंच डॉ. ज्योत्स्ना पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत पाटील, पोलीस पाटील मोहन चादणे यांनी केले आहे. याबाबत वनविभाग पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचलत का?