

मिरज : पुढारी वृत्तसेवा
येथील ख्वॉजा शमना मीरासाहेब उरुसानिमित्त परंपरेप्रमाणे आज मंडप विधी झाला. दि. 26 रोजी उरुसाचा मुख्य दिवस आहे. उरुसाला प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. दर्ग्यातील संगीत महोत्सव होणार आहे.
यंदा मिरजेच्या मीरासाहेब दर्ग्याचा 647 वा उरूस आहे. दि. 26 रोजी उरुसाचा मुख्य दिवस आहे. आज दि. 17 पासून विधी सुरू झाले. आज मंडप उभारण्यात आला. दर्ग्यास रंगरंगोटी करण्यात आली आहे. 2020 मध्ये कोरोनामुळे उरूस रद्द करण्यात आला होता. 2021 याही वर्षी उरूस रद्द करण्यात आला. त्यामुळे उरुसाच्या कालावधीत दर्ग्यामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती.
गतवर्षी उरुसाच्या मुख्य दिवशी परंपरेप्रमाणे चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ दर्ग्यास अर्पण करण्यात आला होता. त्यावेळी मोजकेच बांधव उपस्थित होते. या दर्ग्यामध्ये चिंचेच्या झाडाखाली सुमारे 150 वर्षे संगीत सेवा केली जाते. त्यालाही खंड पडला होता. संगीतरत्न अब्दुल करीम खाँ साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे दर वर्षी संगीत महोत्सव होतो. गतवर्षीही महोत्सव रद्द करण्यात आला होता. प्रशासन परवानीबाबत सकारात्मक आहे.
हेही वाचलत का ?