fraud : सांगलीत एकास 15 लाखाला गंडा | पुढारी

fraud : सांगलीत एकास 15 लाखाला गंडा

 fraud : सांगली : पुढारी वृत्तसेवा : मुंबईमध्ये कमी किमतीत फ्लॅट घेऊन देण्याच्या आमिषाने 15 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अभिजित कुमार बेले (वय 35, रा. दत्तनगर, विश्रामबाग, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दिलीपसिंग शेवाळे (वय 60), ध्रुवसेन शेवाळे (35), दिग्विजय दिलीपसिंग शेवाळे (30, सर्व रा. देवकीनंदन अपार्टमेंट, नागाळा पार्क, कोल्हापूर) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ( fraud )

पोलिसांनी सांगितले, संशयित हे बेले यांच्या मित्राच्या ओळखीचे आहेत. संशयितांनी त्यांना वडाळा (मुंबई) येथे कमी किमतीत फ्लॅट घेऊन देतो, असे सांगितले होते. 2013 ते 2016 पर्यंत यासाठी त्यांनी बेले यांच्याकडून वेळोवेळी 15 लाख 37 हजार रुपयांची रक्कम
घेतली. ( fraud )

ही रक्कम घेताना संशयितांनी बँक खात्यांवर घेतली होती. पैसे घेऊनही फ्लॅटसाठी टाळाटाळ होत होती. यासाठी बेले यांनी वारंवार पाठपुरावाही सुरू ठेवला होता. तरीही फ्लॅट आणि दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने अखेर बेले यांनी संशयितांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ( fraud )

Back to top button