अर्चना गौतम : हस्तिनापुरातून माजी मिस बिकिनी इंडिया लढणार - पुढारी

अर्चना गौतम : हस्तिनापुरातून माजी मिस बिकिनी इंडिया लढणार

नवी दिल्ली : पीटीआय

उत्तर प्रदेशातील हस्तिनापूर मतदारसंघातून काँग्रेसने अभिनेत्री, मॉडेल अर्चना गौतम यांना उमेदवारी दिली आहे. 26 वर्षीय अर्चना या 2018 मध्ये माजी मिस बिकिनी इंडिया किताबाच्या मानकरी ठरल्या होत्या. मिस बिकिनी कॉसमॉस स्पर्धेतही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान, अर्चना यांचे काही जुने फोटो व्हायरल झाले आहेत. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आणि ‘हसिना पारकर’ या चित्रपटांतील त्यांच्या फोटोवरून त्यांना ट्रोल केले जात आहे. अशा हल्ल्याने मी घाबरणार नाही, उलट पुढेच जात राहीन. मी देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे.

महाभारतातील द्रौपदीच्या वस्त्रहरणामुळे या भागावर शाप आहे. त्यामुळे या भागाचा विकास झाला नाही; शापातून मुक्‍त होण्यासाठी खूप प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे अर्चना गौतम यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी-वधेरा यांनी मात्र अर्चना यांना ‘घाबरू नका, खंबीर राहा,’ असा दिलासा दिला आहे. अर्चना यांनी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Back to top button